breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘शरद पवारांचं बोट सोडलं तर नेता…’, अमोल कोल्हेंचा अजित पवारांना इशारा

Amol Kolhe : विधानसभेची निवडणूक पुढील दोन महिन्यांमध्ये केव्हाही जाहीर होऊ शकते. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. सध्या अनेक नेत्यांचे महाराष्ट्रभर दौरे सुरु असून या दौऱ्यांच्या माध्यमातून विविध मतदारसंघात सभा, मेळावे आणि आढावा बैठका घेतल्या जात आहेत. तसेच विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत उमेदवारांची चाचपणी करत विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच राजकारण सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका टिप्पणी केली जात आहे.

आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सध्या सुरु आहे. या कार्यक्रमात बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटावर हल्लाबोल करत सूचक इशाराही दिला आहे. “झाडानं मूळं सोडली तर झाड पडतं आणि नेत्यांनी शरद पवारांचं बोट सोडलं तर नेता पडतो”, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानाचा रोख हा अजित पवार गटाकडे होता.

हेही वाचा     –      क्रिकेटप्रेमींनो लवकरच रंगणार दुलीप ट्रॉफी स्पर्धा! BCCI ने निवडले चार नवे कर्णधार

“झाड कितीही डेरेदार असलं तरी झाडाने जर मूळं सोडली तर झाड पडतं आणि नेत्यांनी शरद पवारांचं बोट सोडलं तर नेता निवडणुकीत पडतो. काही जणांनी स्वार्थासाठी वेगळा निर्णय घेतला. आता काल-परवा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं एक विधान समोर आलं. ते म्हणाले की, सात-आठ निवडणुका झाल्या आहेत, आता रस राहिला नाही. मात्र, आपण एक वस्ताद पाहिला आहे की १४ निवडणुका झाल्या, तरीही ते म्हणतात महाराष्ट्राच्या हितासाठी मैदान सोडणार नाही. त्या वस्तादाचं नाव शरद पवार आहे. आता कोणी म्हणत असेल की सात निवडणुका झाल्या आहेत रस नाही. ज्यांनी स्वार्थासाठी उडी मारली, त्यांच्यातील नेत्यांनाही प्रश्न पडला असेल सेनापतीच गळपटला तर सैन्यांनी कोणाच्या भरोवशावर लढायचं?”, असा हल्लाबोल खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटावर केला.

“आता काळजी करू नका. आगामी काळात महाविकास आघाडीचं सरकार असणार आहे. येणाऱ्या निवडणुकीनंतर वसमतचा आमदारही हा सत्तेतला आमदार असणार आहे. वसमत शहराला जो अवैध धद्यांचा विळखा पडला आहे, ते सोडवण्याचं कामही आपण करणार आहोत. आता जाता-जाता एवढंच सांगतो बस्स झाली टक्केवारी आणि वाजवा तुतारी अन् गाडा गद्दारी”, असं म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटावर टीका केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button