क्रिकेटप्रेमींनो लवकरच रंगणार दुलीप ट्रॉफी स्पर्धा! BCCI ने निवडले चार नवे कर्णधार

Duleep Trophy 2024 Squad | क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. बीसीसीआयने दुलीप ट्रॉफी स्पर्धेची घोषणा केली आहे. यावेळी BCCI ने चार संघ देखील जाहीर केले आहेत. या स्पर्धेला ५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून २२ सप्टेंबर रोजी अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. यावेळी शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, अभिमन्यू ईस्वरन आणि श्रेयस अय्यर हे चार संघांचे कर्णधार असणार आहेत. विशेष बाब म्हणजे रोहित शर्मा, विराट कोहली, आर. अश्विन अन् जसप्रीत बुमराह दुलीप ट्रॉफी खेळणार नाहीत.
दुलीप ट्रॉफीचे चार संघ कोणते?
Team A : शुभमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, केएल राहुल, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विद्वथ कावेरप्पा, कुमार कुशागरा, शास्वत रावत.
हेही वाचा – ना अर्ज, ना कागदपत्रे; तरी लाडक्या बहिणीचा निधी भावाच्या खात्यात जमा
Team B : अभिमन्यू इस्वरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, रिषभ पंत, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज,यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, आर. साई किशोर, मोहित अवस्थी, एन. जगदीसन.
Team C : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल, सूर्यकुमार यादव, बी. इंद्रजिथ, रितीक शोकीन, मानव सुथार, उमरान मलिक, व्यषक विजयकुमार, अन्सुल कंबोज, हिमांशु चौहान, मयंक मार्कंडे, आर्यन जुयाल,संदीप वॉरिअर.
Team D : श्रेयस लियर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, इशान किशन, रिकी भुई, सरांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भरत, सौरभ कुमार.





