नितेश राणेंच्या टीकेला अमोल कोल्हेंचे प्रत्युत्तर; म्हणाले वडीलांच्या कर्तृत्वावर
![Amol Kolhe said that the people who make the poli should think about the achievements of their elders](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/amol-kolhe-and-nitesh-rane-780x470.jpg)
“सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांनी माझ्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीवर भाष्य करू नये”
मुंबई : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी खासदार अमोल कोल्हेंवर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली होती. त्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी पलटवार केला आहे. यावेळी कोण नितेश राणे? आणि कुठल्या पक्षात आहे? नितेश राणेंची भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे का? भाजपचं राणेंना किंमत देत नाही, जे वडीलांच्या कर्तृत्वावर पोळ्या भाजणारे आहेत, बोलतांना संस्कार प्रकट होत असतात याचा विचार करा असा टोलाच कोल्हे यांनी लगावला आहे. याशिवाय नितेश राणे यांचे नाव घेणं टाळत त्यांनी छ. संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचवण्यासाठी काही योगदान दिलं आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.
निवडणुकीत कोणाला विजयी करायचे व कोणाचा पराजय करायचा हे जनता ठरवते. त्यामुळे सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांनी माझ्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीवर लोकांनी ठेवलेल्या विश्वासाबद्दल भाष्य करू नये, असे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृत परंपरा आहे. त्यामुळे चांगल्या गोष्टींचा आदर्श आपण नेहमी घेतला पाहीजे. मात्र क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे, त्यामुळे अशा व्यक्तींवर बोलणे अमोल कोल्हे यांनी टाळले.
इतकंच काय मी सिंधुदुर्ग मध्ये नक्की कार्यक्रमाचे प्रयोग करेल, ते याची देही याची डोळा त्यांनी पाहावं असेही अमोल कोल्हे यांना ठणकावून सांगितलं आहे.