Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

दुसरे ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात, अमित ठाकरे यांना माहीम मधून उमेदवारी

मुंबई | विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत एकूण ४५ नावं आहेत. त्यात राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अमित ठाकरे यांना माहिममधून उमेदवारी मिळाली आहे. तर वरळीमधून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात संदीप देशपांडे यांना मनसेने उमेदवारी दिली आहे. तर ठाणे शहरमधून अविनाश जाधव आणि कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील यांना मनसेचं तिकीट देण्यात आलं आहे.

मनसेची दुसरी यादी :

राजू पाटील – कल्याण
अमित ठाकरे – माहीम
शिरीष सावंत – भांडुप
संदीप देशपांडे – वरळी
अविनाश जाधव – ठाणे शहर
संगिता चेंदवणकर – मुरबाड
किशोर शिंदे – कोथरुड
साईनाथ बाबर – हडपसर
मयुरेश वांजळे – खडकवासला
प्रदीप कदम – मागाठाणे
कुणाल माईणकर – बोरीवली
राजेश येरुणकर – दहिसर
भास्कर परब – दिंडोशी
संदेश देसाई – वर्सोवा
महेश फरकासे – कांदिवली पूर्व
वीरेंद्र जाधव – गोरेगांव
दिनेश साळवी – चारकोप
भालचंद्र अंबुरे – जोगेश्वरी पूर्व
विश्वजीत ढोलम – विक्रोळी
गणेश चुक्कल – घाटकोपर पश्चिम
संदीप कुलथे – घाटकोपर पूर्व
माऊली थोरवे – चेंबूर
जगदीश खांडेकर – मानखुर्द-शिवाजीनगर
निलेश बाणखेले – ऐरोली
गजानन काळे – बेलापूर
सुशांत सूर्यराव – मुंब्रा-कळवा
विनोद मोरे – नालासोपारा
मनोज गुळवी – भिवंडी-पश्चिम
संदीप राणे – मिरा भाईंदर
हरिश्चंद्र खांडवी – शहापूर
महेंद्र भानुशाली – चांदिवली
प्रमोद गांधी – गुह
रविंद्र कोठारी – कर्जत-जामखेड
कैलास दरेकर – आष्टी
मयुरी म्हस्के – गेवराई
शिवकुमार नगराळे – औसा
अनुज पाटील – जळगाव
प्रवीण सूर – वरोरा
रोहन निर्मळ-  कागल
वैभव कुलकर्णी – तासगांव-कवठे महाकाळ
महादेव कोनगुरे – सोलापूर दक्षिण
संजय शेळके – श्रीगोंदा
विजयराम किनकर – हिंगणा
आदित्य दुरुगकर – नागपूर दक्षिण
परशुराम इंगळे – सोलापूर शहर, उत्तर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button