breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘अजितदादा, बऱ्याच काळाने तुम्ही योग्य जागेवर’; अमित शाहांची कोपळखळी

पिंपरी : केंद्रीय सहकार संस्थेने तयार केलेल्या संकेतस्थळाचं उद्घाटनासाठी गृहमंत्री अमित शाह पुण्यात आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित आहेत. यावेळी अमित शाह यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री झाल्याच्या शुभेच्छा दिल्या. अजितदादा, बऱ्याच काळाने तुम्ही योग्य जागेवर आलात, असं अमित शाह म्हणाले.

अमित शाह म्हणाले की, मी पहिल्यांदाचा अजित पवारांसोबत एका मंचावर आहे. मोठ्या कालावधीनंतर अजित दादा तुम्ही आता योग्य जागेवर, तुम्ही आधीच या जागेवर यायला हवं होतं. CRCS चा कार्यक्रम आजपासून पूर्णपणे डिजीटल असणार असल्याचं अमित शाह म्हणाले. देशातील ४२ टक्के संस्था महाराष्ट्रात आहेत. सरकार क्षेत्र पारदर्शकतेशिवाय चालू शकत नाही. ९ वर्षांमध्ये मोदींनी लोकांच्या सर्व गरजा पूर्ण केल्या. ६० वर्षापासून लोकांची जी स्वप्न होतीत ती मोदींनी पूर्ण केली आहेत.

हेही वाचा – Scam २००३ टीझर प्रदर्शित आता अब्दुल करीम तेलगीचा घोटाळा येणार उघडकीस

देश एका बाजूला आहे, अन महाराष्ट्र एका बाजूला. कारण देशातील सहकारी संस्थांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्राचा वाटा हा ४२ टक्के आहे. महाराष्ट्राचं हेच योगदान दाखवण्यासाठी मी इथं सर्वांना घेऊन आलोय, असं अमित शाह म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button