‘आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांची चौकशी करावी’; मनसेच्या नेत्याची मागणी
आम्ही कुणालाही घाबरत नाही, घाबरणार नाही
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी हल्ला करण्यात आला आहे. मॉर्निग वॉकसाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यानंतर अमेय खोपकर म्हणाले की, माझी मुंबई पोलिसांना विनंती आहे की महाराष्ट्रातले चिंधीचोर गुंड आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं आणि त्यांची चौकशी करावी. संदीप देशपांडे सातत्याने या लोकांच्या विरोधात मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांची चौकशी करावी आणि त्यात तथ्य आढळलं तर त्यांना अटक करावी, असं म्हटलं आहे.
हल्ल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही कुणालाही घाबरत नाही, घाबरणार नाही. असा घाबरवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. आम्ही कुणालाही भीक घालत नाही. यामध्ये कोण लोक आहेत हे सर्वांना माहिती आहे.