‘..तर भारत विश्वचषक जिंकला असता’; अखिलेश यादव यांचं मोठं विधान
![Akhilesh Yadav said that Ahmedabad's pitch was also bad](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Akhilesh-Yadav--780x470.jpg)
Akhilesh Yadav : एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०२३च्या अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. यानंतर जगभरातून अहमदाबादच्या खेळपट्टीवरून बीसीसीआयवर टीका होत आहे. दरम्यान, यावरून समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी देखील अहमदाबादच्या मैदानात खेळवण्यावरून आयोजकांवर टीका केली आहे.
अखिलेश यादव म्हणाले, विश्वचषक स्पर्धेतला अंतिम सामना गुजरातमध्ये खेळवण्यात आला. हा सामना जर लखनौमध्ये खेळवला असता तर टीम इंडियाला अनेकांचा आशीर्वाद मिळाला असता. लखनौच्या स्टेडियमला अटल बिहारी वाजपेयींचं नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे भारताला देवाचा आणि वाजपेयींचादेखील आशीर्वाद मिळाला असता. तसेच भारत जिंकला असता.
हेही वाचा – तुकाराम महाराजांवरील ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर धीरेंद्र शास्त्रींचं स्पष्टीकरण; म्हणाले..
#WATCH | Etawah, UP: Samajwadi Party Chief Akhilesh Yadav says, " The match (World Cup 2023 final) that took place in Gujarat, if it had happened in Lucknow, they (team India) would have got blessings of so many…if the match had happened there (Lucknow), team India would have… pic.twitter.com/ANRRB6XToG
— ANI (@ANI) November 21, 2023
मला असं ऐकायला मिळालं आहे की अहमदाबादची खेळपट्टीदेखील खराब होती. तसेच लोकांची तयारी अपूर्ण होती. कधी कधी काळ सांगतो की, आता त्यांची (भाजपा) वेळ राहिली नाही. आता दुसऱ्यांची वेळ आली आहे, असं अखिलेश यादव म्हणाले.