breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

आज काय वेगळा मूड आहे का? जयंत पाटलांच्या प्रश्नावर अजित पवारांची शेरोशायरी; म्हणाले..

मुंबई | राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज महाराष्ट्राच्या विधानसभेत अर्थमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अजित पवारांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देणारं भाषण केलं. अजित पवार यांनी या भाषणात विरोधी पक्षांनी केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून विरोधकांना राजकीय चिमटे काढले. त्यांच्या विधानांवर सभागृहातील सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांनीही हसत दाद दिली.

अजित पवार म्हणाले, काही सदस्यांनी अर्थसंकल्पाचं कौतुक केलं. मी सगळ्यांनाच धन्यवाद देतो. तुम्ही केलेल्या सूचनांची आम्ही नोंद घेतली आहे. काही सदस्यांनी आर्थिक स्थितीच्या बाबतीत मुद्दा उपस्थित केला. महसूल, राजकोषीय तूट, कर्जाचा बोजा यावर चर्चा केली. मला सभागृहाला सांगायचंय की इथे आजपर्यंत जयंत पाटलांचं एक रेकॉर्ड होतं ९ वेळा अर्थसंकल्प मांडायचं. पण मला दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडायची संधी देण्यात आली आहे. आम्हालाही थोडाफार अनुभव आहे.

आज काय वेगळा मूड आहे का? असं जयंत पाटील म्हणताच अजित पवारांनीही त्याच स्टाईलमध्ये टोला लगावला. काय करणार? मोठी जबाबदारी वाढली की मूड बदलावा लागतो. कुणाच्या हाताखाली काम करत असताना सगळं तिथे ढकलावं लागतं. त्यांनी केलं, मी कुठे काही केलं? असं म्हणावं लागतं, असं अजित पवारांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

हेही वाचा    –      ‘पाणीटंचाई असलेल्या भागात टँकरने पाणीपुरवठा करणार’; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा 

मला दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली. आम्हाला इतरांइतका अनुभव नसेल. पण थोडाफार अनुभव आहे. महाविकास आघाडी आणि आता महायुतीतही अर्थसंकल्प मांडण्याची संधी दिली आहे. पण एक गोष्ट मी पाहिली आहे. मविआकडून अर्थसंकल्प मांडला तेव्हा महायुतीकडून विरोध व्हायचा. आता महायुतीकडून अर्थसंकल्प मांडला, तर मविआकडून विरोध होत आहे. हरकत नाही. तो मनुष्यस्वभाव आहे, असं अजित पवार म्हणाले.

विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे लोकशाहीचे दोन स्तंभ आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवारांनी भाषणात काही चांगले मुद्दे मांडले आहेत. त्यांना तितकाच सकारात्मक प्रतिसाद देण्याची आमची भूमिका आहे. त्यासाठी मी काही ओळी म्हणून दाखवतो” असं म्हणत अजित पवारांनी एक शेर वाचून दाखवला.

…प्यार करोगे, तो प्यार करेंगे
हाथ मिलाओगे, तो हाथ भी मिलाएंगे
गले मिलोगे तो गले भी मिलेंगे
सितम करोगे तो सितम करेंगे
हम आदमी है तुम्हारे जैसे
जो तुम करोगे, वो हम करेंगे!

अजित पवारांनी हा शेर वाचताच पुन्हा एकदा समोरून भास्कर जाधव यांनी, आज मूड जरा वेगळा दिसतोय, असा शेरा मारला. त्यावर, बघा आता चांगला मूड झाला तरी वाईट वाटतंय. कठीणच आहे राव, अशी मिश्किल टिप्पणी केली. त्यावर पुन्हा एकदा सभागृहात हशा पिकला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button