‘सरकार झोपलंय का?’ अजित पवार सरकारवर संतापले

बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा?
मुंबई : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीचा पेपर बुलढाण्यात आज फुटला. बारावीची परीक्षा सुरू झाल्यापासून सातत्याने विविध तक्रारी प्रप्त होत आहेत. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकार झोपलं आहे का? असा सवाल करत धारेवर धरले.
बारावीचे पेपर सुरु आहेत. बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा येथे परीक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा? पेपरफुटीचे प्रकार असे वारंवार घडतातच कसे? सरकार झोपलंय का? असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.
गेल्या काही दिवसात राज्यात पेपरफुटीचे प्रकार वाढले आहेत. अभ्यास करणाऱ्या मुलांवर हा अन्याय आहे. पेपरफुटीच्या मागे कोणतं रॅकेट कार्यरत आहे का? याची सखोल चौकशी केली पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई करून राज्यात सातत्यानं सुरु असणारे हे गैरप्रकार थांबले पाहिजेत, असंही अजित पवार म्हणाले.





