breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

महाविकास आघाडीत बिघाडी? पुणे लोकसभा जागेवरून अजित पावारांचं मोठं विधान

पुणे : आगामी निवडणुकांसाठी भाजपा आणि शिंदे गट यांच्यातील जागावाटपाप्रामाणेच महाविकास आघाडीमध्ये नेमकं जागावाटप कसं होणार? याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यातच महाविकास आघाडीतच पुण्यातील लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत खडाजंगी होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

अजित पवार म्हणाले की, आम्ही दोघांनी सांगून काही होणार नाही. वरच्या स्तरावर चर्चा होईल. पण एक आहे. आज काँग्रेसनं काहीही म्हटलं, तरी पुण्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. आमदारांना पडलेली मतं बघा. सहा वर्षांपूर्वी झालेल्या महानगर पालिकेच्या निवडणुकीतही काय परिस्थिती होती ते बघा.

हेही वाचा – IPL2023Final : चेन्नई विरुद्ध गुजरात, आज होणार महामुकाबला!

पुण्याची जागा माझ्या माहितीप्रमाणे विठ्ठलराव गाडगीळांनंतर कधीही काँग्रेसनं जिंकलेली नाही. गेल्या वेळी गिरीश बापट निवडून आले. काही लाखांनी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले. त्याआधी अनिल शिरोळे निवडून आले. तेव्हाही काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले. त्याआधीही भाजपाचेच उमेदवार निवडून आले. सातत्याने निवडणुकीला उभे राहिल्यानंतर तिथे ते पराभूत होत आहेत. असं असेल तर तिथे त्यांच्या मित्रपक्षांपैकी कुणाची ताकद असेल तर त्याला ती जागा दिली पाहिजे. अर्थात, अजून ते अंतिम झालेलं नाही. ती जागा आम्हाला मिळावी अशी आमची इच्छा आहे, असं अजित पवार म्हणाले.

माविआत फूट पडावी अशं त्यांना वाटतंय. ते तशी स्वप्नं बघत असतील, तर त्यांना शुभेच्छा! जागावाटपासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी एकत्र बसतील. व्यवस्थित जागावाटप होईल. आज तिन्ही पक्षांची प्रत्येक जिल्ह्यात कमी-अधिक ताकद आहे. तिन्ही पक्ष एकमेकांच्या उमेदवारांसाठी मनापासून काम करतील. आम्हाला विश्वास आहे की यात व्यवस्थित, तुटेपर्यंत न ताणता जागावाटप वगैरे होईल, असंही अजित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button