Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? अजितदादांनी थेट तारीखच सांगितली..

Ajit Pawar | राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र, अद्याप महायुतीच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. नेमका हा विस्तार कधी होणार? याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज अजित पवार यांनी सहकुटुंब त्यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. शरद पवारांची भेट घेऊन बाहेर आलेल्या अजित पवारांना माध्यमांनी राज्य मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? याबाबत विचारणा केली. यावर अजित पवार म्हणाले, की राज्यात सध्या मुख्यमंत्री व आम्ही दोन उपमुख्यमंत्री यांचाच शपथविधी झाला आहे. त्यामुळे सगळ्यांनाच इतर मंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? याबाबतची उत्सुकता आहे. बहुतेक १४ तारखेला हा शपथविधी होईल.

हेही वाचा     –      शरद पवार यांच्या घरी काय चर्चा? अजित पवार म्हणाले.. 

दरम्यान, १४ तारखेला नेमके कुणाचे किती मंत्री शपथ घेणार? याविषयी अनेक अंदाज वर्तवले जात आहेत. त्यानुसार भारतीय जनता पक्षाचे २०, एकनाथ शिंदेंचे १३ तर अजित पवारांचे १० आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button