‘सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्राला उभं करणं चूक होती’; अजित पवारांचं वक्तव्य
![Ajit Pawar said that pitting Sunetra against Supriya Sule was a mistake](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Ajit-Pawar-4-780x470.jpg)
Ajit Pawar | नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ होता बारामती. बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरूद्ध अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी दिली. या निवडणूकीत सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. मात्र, आता अजित पवार यांनी सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार हा जो सामना झाला तो व्हायला नको होता असं म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं पण बहिणी सगळ्या लाडक्या आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण चालतं. राजकारण हे पार घरात शिरू द्यायचं नसतं. मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली. मी माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता. आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यासारखं होतं. आज मला माझं मन सांगतं आहे की तसं व्हायला नको होतं.