धमक होती तर काढा ना स्वत:चा पक्ष, कुणी अडवलं होतं? अजितदादांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
![Ajit Pawar said that if there was a threat, do not withdraw your own party, someone had blocked it](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Ajit-Pawar-780x470.jpg)
मुंबई | निवडणुक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह अजित पवार गटाला बहाल केलं आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या जुन्या भाषणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले होते, अरे ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला आणि तो वाढवला, मुंबईच्या शिवाजी पार्कवर या पक्षाची स्थापना केली आणि हा पक्ष महाराष्ट्राच्या सर्वदूर पोहोचवला. त्यांचाच पक्ष तुम्ही काढून घेतलात. त्यांचं चिन्ह काढून घेतलंत. निवडणूक आयोगाने जरी निर्णय दिला असला तरी हा निर्णय जनतेला पटलाय का, त्याचा विचार झाला पाहिजे. तुमच्यात धमक होती तर स्वतःचा काढा, तुम्हाला कोणी अडवलं होतं? असं ते म्हणाले.
हेही वाचा – ‘आमदार संपर्कात, निवडणुकांच्या आधी अनेकांची घरवापसी होईल’; शरद पवार गटातील नेत्याचा दावा
अजित पवारांचे हे भाषण आज तुफान वायरल होणार.
हे भाषण गावागावात आणि चौकाचौकात लावून जनतेला दाखवून दिल पाहिजेल की अजित पवार शब्दाचा पक्का नाही.#MaharashtraPolitics #NCPpic.twitter.com/XsJcVNfEuH
— Adv Anand Dasa (@Anand_Dasa88) February 7, 2024
निवडणूक आयोगाने मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत जो निकाल दिला. असाच काहीसा निर्णय काही महिन्यांपूर्वी शिवसेनेबाबतही दिला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि पक्षाचं चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे. या निकालावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. अजित पवार तेव्हा विरोधी पक्षनेते होते.