मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी औरंगजेब कबरीचा वाद आणि नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम समुदायाशी संवाद साधला. मुस्लीम समुदायाला धमकविण्याचा किंवा जातीय तेढ करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिला आहे.
अजित पवार म्हणाले, की भारत हा विविधतेचे प्रतिक असलेला देश आहे. विभाजन करणाऱ्या शक्तींच्या जाळ्यात कुणीही अडकू नये. तुमचा बंधू म्हणून मी तुमच्या पाठिशी उभा आहे. जर कुणी मुस्लीम बांधव आणि भगिनींना त्रास देण्याचा किंवा त्यांच्याकडे डोळे वटावरून पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडले जाणार नाही.
हेही वाचा : आरती पाटील, सुकांत कदम सुवर्णपदकासाठी खेळणार
आपण होळीचा सण एकत्र साजरा केला. आता गुढीपाडवा आणि ईदही एकत्र साजरा करू. हे सर्व सण आपल्याला एकत्र राहण्याचाच संदेश देतात. आपण सण एकत्र साजरे करतो कारण एकता ही आपळी शक्ती आहे. मुस्लीम समुदायाच्या पाठिशी मी खंबीरपणे उभा आहे, असं अजित पवार म्हणाले.
रमजान हा सण केवळ मुस्लीम समुदायापुरता मर्यादित नाही. रमजानने मानवतेचा संदेश दिला असून त्याग आणि स्वयंशिस्तीचे धडे यातून मिळतात. या पवित्र महिन्यात वंचितांचे दुःख काय आहेत, हे समजते. रमजानच्या महिन्यात शरीर आणि मनाचीही शुद्धता होते, असेही अजित पवार म्हणाले.