लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस, दोन महिन्यांचे पैसे एकत्रच मिळणार; अजित पवारांची घोषणा
![Ajit Pawar said that he will get two months' money together](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Ajit-Pawar-780x470.jpg)
Ajit Pawar | महायुती सरकारने काही महिन्यांपुर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना महिन्याला १५०० रुपये देण्यात येत आहेत. राज्य सरकारने सर्वात आधी दोन महिन्यांचे एकत्र म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे मिळून महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा केले होते. त्यानंतर पुन्हा सप्टेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना अजून एक मोठी खुशखबर दिली आहे.
लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन महिन्यांचे पैसे खात्यावर जमा होणार असून नोव्हेंबर महिन्यांचे पैसे देखील ऑक्टोबरमध्येच म्हणजे दिवाळीलाच जमा होणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
हेही वाचा – सुवर्णकार समाजाची भावना: आमदार महेश लांडगेच्या सहकार्यामुळे ‘‘आजि सोनियाचा दिनु..’’
अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आधी दोन महिन्यांचे तीन हजार दिले. त्यानंतर आता लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे पैसे दिले आहेत. मात्र, आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे लाडकी बहीण योजनेचे पैसे १० ऑक्टोबरच्या आधी दिवाळी भाऊबीजेची ओवाळणी बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे, हा शब्द मी तुम्हाला देतो.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे लाडकी बहीण योजनेचे पैसे १० ऑक्टोबरच्या आधी म्हणजे भाऊबीजेलाच बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहेत, असं अजित पवार यांनी सांगितलं.