अजित पवार यांनी घेतली शरद पवार यांची भेट; जयंत पाटील यांनी सांगितले कारण

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गटातील सर्व मंत्र्यांसह शरद पवार यांची भेट घेतली. भेटीनंतर कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार हे आमचे दैवत आहेत. आम्ही वेळ न मागता आलो भेटलो. शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. पक्ष एकसंघ कसा राहू शकतो, याचे मार्गदर्शन करावे आणि विचार करावे, अशी विनंती शरद पवार यांना केली, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
जयंत पाटील म्हणाले की, आता झालेली घटना झाली. ही अनपेक्षित घटना आहे. यावर विचार केला नव्हता. त्यामुळे यावर भाष्य करणं संयुक्तिक वाटत नाही. सर्वजण बसलेल्यानंतर चर्चा करून पुढची दिशा ठरवू, अचानक पणे भेट झाली. त्यातून दिलगिरी व्यक्त केली. आम्ही काहीही निश्चित केलं नाही.
हेही वाचा – Chandni Chowk : उड्डाणपूल प्रकल्पाचे उर्वरित काम गतीने करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना
विरोधी पक्षनेत्यासंदर्भात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची चर्चा झाली आहे. काँग्रेसचे आमदार आमच्यापेक्षा जास्त असतील, तर विरोधी पक्षनेतेपदाची जागा ही काँग्रेसकडे जाईल. अधिवेशन सुरू झाल्यावर ती प्रतिक्रिया सुरू होईल. २० आमदार आमच्याकडे आहेत. बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्यासोबत बोललो. ते वरिष्ठांशी बोलतील. त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. विरोधी पक्षनेत्याने राजीनामा दिला. त्यामुळे उरलेल्या पक्षांशी विचारविनिमय घेऊन विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाईल, असंही जयंत पाटील म्हणाले.




