TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमुंबईराजकारणराष्ट्रिय

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे गोमाता नगरमधील घर व कार्यालयाचा ताबा महापालिकेने घेतला

मुंबईः माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे गोमाता नगरमधील घर व कार्यालयाचा ताबा महापालिकेने घेतला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी ट्विट करुन ही माहिती दिली. गेली दहा वर्षे पेडणेकर यांच्याकडे गोमाता नगरमधील घर आणि कार्यालयाचा अवैध ताबा होता. पेडणेकर यांना सर्व हिशेब द्यावा लागेल, असे सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पालिकेने या कारवाईची अधिकृत माहिती दिलेली नाही. किशोरी पडणेकर यांनीही या कारवाईला दुजोरा दिलेला नाही. हिसाब देना पडा’ असे किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पेडणेकर यांनी गोमाता नगरमधील घर आणि कार्यालय बेकायदापणे घेतले असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्याची तक्रारही दिली होती. त्याच्या चौकशीची मागणी केली होती. अखरे पालिकेने यावर कारवाई केली असल्याचा दावा सोमय्या यांनी केला. तसेच दादर येथील एसआरए प्रकल्पात किशोरी पेडणेकर यांनी गैरव्यवहार केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दादर एसआरए प्रकल्प घोटाळ्यात तीन आरोपी अटकेत आहेत. अटकेत असलेल्या महानगरपालिका वसाहत अधिकाऱ्यांशी किशोरी पेडणेकर यांनी व्हॉटसअप चॅट केल्याचे समोर आले. त्यामळे दादर पोलिसांनी पेडणेकर यांचीह सुमारे अडीच तास चौकशी केली. दादर एसआरए प्रकल्पात १ कोटी ३५ लाख रुपयांचा घोटाळा झाला असून हे पैसे ८ ते ९ जणांकडून घेण्यात आले आहेत, असा आरोप आहे.

ज्या पद्धतीने हे रंगवलं जातंय त्यामधलं दहा टक्केही खरं नाही. साप म्हणून दोरी बडवण्याचा प्रकार सुरु आहे. मी कायद्याची लढाई लढत आहे. मी कोणत्याही आरोपांना उत्तर देणार नाही, असे पेडणेकर म्हणाल्या होत्या. याप्रकरणी त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार होत्या. सोमय्या आणि पेडणेकर यांच्यात वाद रंगला असला तरी एका विवाह सोहळ्यात हे दोन्ही नेते एकत्र आले होते. सोमय्या यांचा मुलगा पेडणेकर यांच्या पाया पडल्याचा व्हिडिओ चांगलाच वायरला झाला. त्यावर अनेक कमेंटही आल्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button