Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

लाडकी बहीणचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आजपासून वितरित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

Aditi Tatkare | महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची माहिती दिली आहे. सप्टेंबर महिन्याचा लाभ आजपासून वितरित होणार असून, पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात येत्या दोन ते तीन दिवसांत रक्कम जमा होईल.

आदिती तटकरे यांनी सांगितले की, ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांनी पुढील दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. राज्य सरकारने ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू केली असून, काही लाभार्थ्यांना आधार ओटीपी न मिळण्याच्या तांत्रिक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मात्र या अडचणी दूर करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा      :        सचिन घायवळला शस्त्रपरवाना दिला कोणी? अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत

दिवाळीपूर्वी महिलांना सन्मान निधी देण्यासाठी शासनाकडून तयारी करण्यात आली आहे. नुकताच सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटी रुपयांचा निधी लाडकी बहिण योजनेसाठी वळवण्यात आला आहे. निधी प्राप्त होताच महिला व बालविकास विभागाला तत्काळ वितरणाचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे शुक्रवारपासून लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत, ज्यामुळे पात्र महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्यातील जवळपास दोन कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. लाभार्थ्यांची सातत्याने पडताळणी केली जात असून, अपात्र ठरलेल्या महिलांचे लाभ थांबविण्यात आले आहेत. पडताळणी दरम्यान २१ वर्षांखालील किंवा ६५ वर्षांवरील महिला, तसेच एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांना मिळणाऱ्या लाभांच्या प्रकरणांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button