breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

लाडकी बहीण योजनेबाबत सरकारकडून दिलासा! आदिती तटकरेंनी दिली महत्वाची अपडेट

मुंबई | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना लाभाचे वितरण १७ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. आतापर्यंत जवळपास १ कोटी ३५ महिला पात्र ठरल्या असून त्यांच्या खात्यात १७ ऑगस्ट रोजी पैसे जमा होणार आहेत. ज्यांचे बँक खाती आधार कार्डशी लिंक नाहीत, त्यांची खाती लिंक करून झाल्यानंतर बँक खात्यात पैसे जमा होतील, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. तसेच, या योजनेची ३१ ऑगस्ट ही शेवटची तारीख ठरवण्यात आली होती. परंतु, आदिती तटकरे यांनी आता यासंदर्भात महत्त्वाची अपडेट दिली आहे.

आदिती तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. ३१ ऑगस्टनंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

हेही वाचा    –      मनू भाकेरने लग्नाबाबतच्या चर्चेवर सोडले मैन; म्हणाली, तो माझा..

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या १७ ऑगस्ट रोजी लाभाचे दोन हप्ते मिळणार आहेत. परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाही, अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे. कोणतीही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाहीत. १७ ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपले बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावेत, असे आवाहनही मंत्री तटकरे यांनी यावेळी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button