महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आम आदमी पार्टीची पिंपरीमध्ये परिवर्तन रॅली
1 मे ला आप ने काढली परिवर्तन रॅली
![Maharashtra Day, Labor Day, Aam Aadmi Party, Pimpri, Transformation Rally,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/Aap-PCMC-780x470.jpg)
पिंपरी-चिंचवडः
आम आदमी पार्टीच्या वतीने काल 1 मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त परिवर्तन बाईक रॅली काढण्यात आली. पिंपरी विधानसभा अंतर्गत या रॅली चे आयोजन आपचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष संतोष इंगळे यांनी केले होते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली, या आनंदा प्रित्यार्थ 1 मे रोजी महाराष्ट्र दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा केला जातो व त्याचप्रमाणे जागतिक कामगार दिनानिमित्त उद्योग नगरी म्हणून आपली ओळख जपणारे पिंपरी चिंचवड शहरांमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रोजगारासाठी शहरात वसलेल्या कामगार बंधूंना मानवंदना देण्यासाठी या रॅली चे आयोजन केल्याचे संतोष इंगळे यांनी सांगितले.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/Untitled-1-1024x629.jpg)
आपची ही परिवर्तन बाईक रॅली एच ए. मैदानातून दुपारी 4 वाजता सुरू होऊन सायं 7 वाजता आकुर्डी येथील शहीद कामगार दत्तात्रय पाडळे यांच्या पुतळ्याजवळ समाप्त झाली. या रॅली मध्ये आम आदमी पार्टीचे शहरातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहीद कामगार दत्तात्रय पाडळे यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर राष्ट्रगीताने रॅली ची सांगता झाली.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त उत्साहात आणि आनंदी वातरणात या रॅली चे उत्कृष्ठ नियोजन केल्याबद्दल आयोजक संतोष इंगळे आणि उपस्थित कार्यकर्त्यांचे आपचे शहर कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी अभिनंदन केले.
आपच्या परिवर्तन रॅली मध्ये चेतन बेंद्रे, अनुप शर्मा, संतोष इंगळे, ब्रह्मानंद जाधव, राज चाकणे, डॉ. अमर डोंगरे, कमलेश ननावरे ,दत्तात्रय काळजे, वाहब शेख, राहुल वाघमारे, स्मिता पवार, सीता केंद्रे, सरोज कदम, मीनाताई जावळे, सीमा यादव, दमयंती नेरेकर, कल्याणी राऊत, यल्लाप्पा वालदोर, गोविंद माळी रोहित सरनोबत, शुभम यादव, सुखदेव कारले, संदीप चनाल, स्वप्निल जेवळे, वाजीद शेख, विजय अब्बड, वैजनाथ शिरसाट, प्रकाश हगवणे, अशोक तनपुरे, योगेश आढागळे, जयवंत इंगळे, बाळासाहेब इंगळे दिलीप खुडे, अशोक शेडगे, अजय सिंग, अजय दिवेदी, संजय मोरे, सुरेश भिसे, महेश बिराजदार, रितेश भामरे, रोहन सौदागर, सुरेश हिंगणे, जिंतूर शहरातील आम आदमीचे पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.