Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

अट्टल गुन्हेगार असिफ दाढी आणि अजित पवार यांच्यात भेट, कारण काय?

पुणे | पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला असिफ महंमद इक्बाल शेख ऊर्फ असिफ दाढी याने उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. काही दिवसांपूर्वीच गजा मारणे याने पार्थ पवार यांची भेट घेतली होती. तेव्हा हे चुकीचे झाल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली होती.

असिफ दाढीने गुरुवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय बंगल्यावर जाऊन अजित पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. असिफ दाढीला राजकारणात येण्याचे वेध लागले असून, त्यासाठी एका कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी तो गेला होता. तृतिय पंथियांसाठी काम करणाऱ्या एक संस्थेसाठी तो काम करतो अशीही माहिती समोर येत आहे.

हेही वाचा     –      सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरातही घसरण, नवे दर काय?

दरम्यान, काही दिवसांपुर्वी पार्थ पवार आणि गजा मारणे यांच्या भेटीचा फोटो समोर आल्यावर, पार्थ पवार यांनी गुंड गजा मारणेची जी भेट घेतली आहे ते अतिशय चुकीचे असल्याचं अजित पवार म्हणाले होते. मात्र, आता अजित पवार आणि असिफ दाढी यांचे फोटो समोर आले आहेत. यावर अजित पवार नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button