रायगड-खालापूरच्या नंदनपाडा ग्रामपंचायतीत ८५ वर्षांच्या आजी विजयी
![85-year-old grandmother wins Nandanpada Gram Panchayat of Raigad-Khalapur](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Raigad-Gram-Panchayat-Election-780x470.jpg)
Gram Panchayat Election Result 2023 : रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यात नंदनपाडा असे एक गाव आहे. या गावात पाण्याची भीषण टंचाई आहे. या गावातील पाणी प्रश्नावर बऱ्याचदा चर्चा झाली मात्र हा प्रश्न काही केल्या सुटत नव्हता.
मात्र ८५ वर्षांच्या आजीने गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे ठरवले. ८५ व्या वर्षी आजीबाई चिमणीबाई दाऊ खरात यांनी निवडणूक लढवली आणि या ग्रामपंचायत निवडणुकीत या आजी विजयी झाल्या आहेत.
हेही वाचा – भोसरीत इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ७० टक्क्यांची घसघशीत सूट!
आजीबाई चिमणीबाई खरात यांना बिनविरोध निवडून येण्याची अपेक्षा होती. परंतु गावातील दुसरी तरुण महिला त्यांच्यासमोर निवडणुकीच्या मैदानात उतरली. त्यानंतर आजीबाईंनी प्रचार सुरु केला. मतदानाचा दिवस आला.
गावातील लोकांनी चांगले मतदान केले. आता मतमोजणीची वाट सर्व जण पाहत होते. सोमवारी मतमोजणी झाली तेव्हा चिमणीबाई खरात आणि प्रतिस्पर्धी उमेदवारास समान मते मिळाले. अखेर ईश्वर चिठ्ठी काढण्याचा निर्णय घेतला. त्यात चिमणीबाई यांचे नाव आले.