पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई, उर्से टोल नाक्यावर ५० लाखांची रोकड जप्त
![50 lakh cash seized at Urse toll booth](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Pimpri-Chinchwad-8-780x470.jpg)
पिंपरी | लोकसभा निवडणुका तोंडावर असताना पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये नाकाबंदी दरम्यान शिरगाव पोलिसांनी पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर तब्बल ५० लाखांची रोकड आढळली आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हद्दीमध्ये नऊ ठिकाणी नाकाबंदी लावली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाका येथे देखील नाकाबंदी करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. २६) उर्से टोलनाका येथे शिरगाव पोलीस वाहनांची तपासणी करत असताना त्यांना एका स्कॉर्पिओ मध्ये ५० लाख रुपये रोख रक्कम मिळाली.
हेही वाचा – मुंबईतील एका हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापेमारी, मुनव्वर फारुकीला घेतलं ताब्यात
पोलिसांनी संबंधित चालकाकडे रकमेबाबत खुलासा मागितला. मात्र त्यास योग्य खुलासा करता आला नाही. त्यामुळे पोलिसांनी ती रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी केली जात असल्याचेही पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी सांगितले.