Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

Pune : पुणे लोकसभा पोटनिवडणूक लवकरच, १२ हजार ६०० ईव्हीएम मशिन उपलब्ध

पुणे : भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे निधन (ता. २९ मार्च रोजी) झाले. बापट यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त आहे. याबाबतची माहिती प्रशासनाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. पुढील वर्षी एप्रिल मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे काही महिन्यांसाठी पोटनिवडणुक होणार की नाही याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. दरम्यान, पोटनिवडणुकीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली नसली, तरी आयोगाकडून मात्र बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट अशा एकूण १२ हजार ६०० मशिन जिल्हा प्रशासनाकडे दिल्या आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून या मशिनची प्राथमिक तपासणी सुरू केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिली गेली आहे.

हेही वाचा – महाविकास आघाडीतील जागावाटपावरून अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले..

निवडणुकीसाठी महत्वाचे असलेले ईव्हीएम मशिन केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. या मशिन नविन आहेत. यामध्ये बॅलेट युनिट चार हजार २००, कंट्रोल युनिट चार हजार २०० आणि व्हीव्हीपॅट चार हजार २०० अशा मशिन प्राप्त झाल्या आहेत.

दरम्यान, पुणे लोकसभा विधानसभा मतदारसंघात वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. पुणे लोकसभा मतदारांची एकूण मतदारसंख्या सुमारे १९ लाख ७२ हजार इतकी आहे. तर मतदानकेंद्रांची सुमारे दोन हजार इतकी आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button