breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
समाजवादी पार्टीच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या, परिसरात खळबळ
लखनऊ | महाईन्यूज
उत्तर प्रदेशातील मऊमध्ये रविवारी सकाळी समाजवादी पार्टीचे (सपा) नेते बिजली यादव यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मोहम्मदाबाद परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी बिजली यादव यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. यानंतर अज्ञात हल्लेखोर फरार झालेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बिजली यादव सकाळी घराबाहेर गेले होते. त्यावेळी हल्लेखोरांनी बिजली यादव यांच्यावर गोळीबार केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडालेली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सुरु आहे. दरम्यान, बिजली यादव यांच्यावरील हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाहीयेत.