breaking-newsताज्या घडामोडीराजकारण
राहुल गांधी म्हणाले, ‘मोदी है तो मुमकिन है’; GDP वरून मोदी सरकारवर निशाणा
![Modi government spoiled the budget of the country and the house, Rahul Gandhi's attack](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Rahul-Gandhi-1592379760.jpg)
नवी दिल्ली | बऱ्याच दिवसांपासून देशातील आर्थिक परिस्थितीबाबत मोदी सरकारवर राहुल गांधी सतत निशाणा साधत आहेत. अशातच पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी भाजपचा ‘मोदी है तो मुमकिन है’ या नाऱ्यासोबत सरकारवर देशातील आर्थिक परिस्थितीवरुन टीकास्त्र लादलं आहे.
राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच ‘मोदी है तो मुमकिन है’ या भाजपच्याच घोषणेचा वापर करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. याआधी ते ‘सूट-बूट की सरकार’ यांसारख्या घोषणा देत सरकारवर निशाणा साधत होते. राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटसोबत एक बातमीही शेअर केली आहे. यामध्ये इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ति यांचा हवाला देत दावा केला आहे की, जीडीपी ग्रोथ 1947 मधील जीडीपीपेक्षाही खाली जाऊ शकते.