Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

प्रजासत्ताक दिनाला पंतप्रधान मोदींनी ४८ वर्षांची परंपरा मोडली

नवी दिल्ली | महाईन्यूज

प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ४८ वर्षांची परंपरा मोडीत काढली. प्रथम इंडिया गेट येथील अमर ज्योती जवान येथे न जाता पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे जाऊन त्यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली. या स्मारकाचे मोदी यांच्या हस्ते २५ फेब्रुवारी २०१९ रोजी पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केले होते.

भारतीय संरक्षण दलातील तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख अमर जवान ज्योती स्मारक येथे जाऊन स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनी शहिदांना श्रद्धांजली वाहतात. १९७२ साली इंडिया गेट येथे १९७१ च्या भारत-पाक युद्धातील शहिदांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारले आहे. यंदा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सीडीएस अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सहभागी झाले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनी राजपथावर ध्वजारोहण केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रीमंडळातील विविध मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते. ब्राझीलचे पंतप्रधान हे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button