breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘भाजपचं सावरकर प्रेम धादांत खोटं’, शिवसेनेची भाजपवर सडकून टिका

मुंबई | महाईन्यूज

विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडले होते. भाजप नेत्यांनी शिवसेनेवर सडकून टिकाही केली होती. यावरून आता ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर निशाना साधला आहे. भाजपचं सावरकरांवरील प्रेम धादांत खोटं होतं. ‘वीर सावरकरांची ढाल ! भाजपचा पुळका खोटा’ या अग्रलेखात भाजपवर सडकून टिका करण्यात आली आहे.

वीर सावरकरांच्या विषयावर सरकारची कोंडी करू असं भाजपला वाटलं होतं मात्र जे स्वतःच कोंडीत सापडले आहेत त्यांनी दुसऱ्यांची कोंडी करण्याची भाषा करू नये. महाराष्ट्रात सरकारची कोंडी करण्यापेक्षा केंद्रातील भाजप सरकारने वीर सावरकरांचा काय सन्मान राखला यावर महाराष्ट्रातील फडणवीस, पाटील, मुनगंटीवार, शेलार आदी मंडळींनी प्रश्न उभे केले पाहिजेत. असं सामनात म्हटलं आहे. भाजप या राजकारणात यशस्वी होणार नाही. लोक यांच्या ढोंग्यांच्या पेकाटात लाथ मारतील असं ठाकरे शैलीत टोलाही भाजपला लगावण्यात आलाय.

भाजपसाठी सावरकर हा आदर किंवा श्रद्धेचा विषय राहिला नसून फक्त राजकारणाचा विषय बनला आहे. भाजपतर्फे विधानसभेत सावरकर गौरवाचा प्रस्ताव आणणे व त्यावर चर्चा करणे ही ‘कोंडी’ करण्याची योजना कशी होऊ शकते ? वीर सावरकर हा फक्त चर्चेचा विषय नाही, तर कृतीचा आणि जगण्याचा विषय आहे. वीर सावरकर हे त्याग, तत्त्व, तेज आणि संघर्षाच्या बाबतीत सगळय़ांनाच पुरून उरले व हयातभर त्यांचे स्थान अढळ राहिले. सावरकरांच्या स्मृतिदिनी त्यांचे पुण्यस्मरण सगळ्यांनीच केले. त्यांच्या स्मरणाचे ढोंग आज जे करीत आहेत त्यांना सावरकर खरेच कळले काय ?, अशी टिका अग्रलेखात करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button