TOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाकडून डास उत्पत्ती करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय आरोग्य कार्यालयाच्या वतीने डेंगू बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून डास उत्पत्ती करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करून सुमारे २९ हजार ५०० रुपयांचा दंड करण्यात आला.
महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक आरोग्य अधिकारी तानाजी दाते, आरोग्य निरीक्षक राजेंद्र उज्जैनवाल, वैभव घोळवे, क्षितिज रोकडे, विक्रम सौदायी यांनी ही कारवाई केली. जाधववाडी चिखली, कुदळवाडी, नेहरूनगर आदी परिसरात डास उत्पत्ती करणाऱ्या आस्थापनांची पाहणी करण्यात आली. या मोहिमेत सुमारे ५० आस्थापनांची तपासणी या महिन्यात करण्यात आली.





