breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

पंतप्रधान-मुख्यमंत्री चर्चा १६ आणि १७ जूनला होणार

नवी दिल्ली | कोरोना संकटाची तीव्रता वाढत आहे. भारतात आतापर्यंत आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येने ३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या यादीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. या बैठकीत देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. ही बैठक पुढल्या आठवड्यात १६ आणि १७ जून रोजी (मंगळवार आणि बुधवार) होणार आहे.

बैठकीत पंतप्रधान परिस्थितीचा आढावा घेतील तसेच कोरोनावर मात करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या काही सूचना असल्यास त्या ऐकून घेतील. या नंतर केंद्रीय मंत्रिमंडळाशी चर्चा करुन पंतप्रधान महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. याआधी लॉकडाऊन आणि अनलॉकच्या निमित्ताने पंतप्रधानांनी अनेकदा मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. लॉकडाऊनची मुदत वाढवणे, लॉकडाऊन शिथील करणे असे महत्त्वाचे निर्णय याच प्रक्रियेतून देशाला विश्वासात घेऊन घेण्यात आले आहेत.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात संवाद सुरू असला तरी स्थानिक पातळीवर येणाऱ्या अडचणींमुळे कोरोना संकटावर मात करताना नव्या आव्हानांना सामोरे जाण्याची वेळ प्रशासनावर येत आहे. हा गुंता सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अर्थचक्राला गती देण्याचा प्रयत्नात देशात अनेक ठिकाणी सोशल डिस्टंस पाळला जात नसल्याचे उघड झाले आहे. प्रमुख्याने सार्वजनिक वाहतुकीच्यावेळी देशातील काही भागांमध्ये प्रचंड गर्दी झाली आणि त्यातून कोरोनाचा धोका वाढल्याचे आढळले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button