breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनराजकारण

ड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया

अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे प्रकरण लागले आहे.सुशांतच्या आत्महत्येचा सुरू झालेला तपास आता ड्रग्ज प्रकरणापर्यंत येऊन पोहचला आहे.सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर आता रोज नवनवीन कलाकारांची नाव समोर येऊ लागली आहे. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शरद पवारांना सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी सुरू असलेल्या तपासादरम्यान आतापर्यंत अनेक ड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावं समोर आली आहेत, यासंबंधी प्रश्न विचारला असता त्यांनी, ‘मला माहिती नाही, मी याकडे लक्ष देत नाही. आत्महत्या कोणाचीही असो दुःख होतं यात काही वाद नाही. पण एका आत्महत्येवरून गेले तीन महिने देशात इतकी गंभीर चर्चा सुरु आहे. मला भीती आहे ती म्हणजे दिवसाला १० ते १५ तर महिन्याला ५० ते ६० शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्याकडे दुर्लक्ष करणं मला योग्य वाटत नाही,’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे.

कृषी विधेयक आणि मराठा आरक्षणसारख्या मुद्द्यावर बोलण्यासाठी मुंबईत एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button