breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमहाराष्ट्रराजकारण
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय
![Krantijyoti Savitribai Phule's birthday to be celebrated as Savitribai Phule Women's Education Day](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Savitribai-fule.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्त्री शिक्षणातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे योगदान आणि त्यांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचविणे गरजेचे असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या दिवशी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत शाळांमध्ये भाषणे, निबंध, वत्कृत्व, परिसंवाद व एकांकिकांचे आयोजन करण्यात येईल.
वाचा- राज्यातील प्राचीन मंदिराचे जतन व संवर्धन करणार- सार्वजनिक बांधकाम विभाग