breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरपले; आमदार महेश लांडगे यांनी माणुसकीचे नाते जपले!

पिंपरी-चिंचवड| प्रतिनिधी |

सध्या देशभरात कोरोनाचे संकट आहे. आता पर्यंत या कोरोनाच्या सावटामुळे अनेकांनी आपल्या परिवारातील व्यक्तींना गमावलं आहे. हे दु:ख पचवण आणि विसरण नक्कीच या सर्वांसाठी सोप नाही. याच कोरोनारुपी संकटाचा घाला अशाच एका लहान मुलीवरही झाला आहे. या संकटामुळे या लहान मुलीला तिचे आई-वडिल दोघांनाही गमवावं लागलं.

यामुलीचे नाव वैष्णवी जोशी असून ती भोसरी येथील इंद्रायणीनगर ईथे राहते.कोरोनामुळे तिच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे. तिचे हे दु:ख कधीही भरून निघणार नाही. आई-वडिलांचे छत्र हरवलेली वैष्णवी सध्या तिच्या मावशीकडे राहत आहे. मात्र मावशीच्या घरची परिस्थितीही जेमतेम असल्यानं वैष्णवीच्या शिक्षणाचे पुढे कसे होणार? एवढी मोठी जबाबदारी कोण घेणार? या चिंतेत तिचे नातेवाईक होते. मात्र वैष्णवीचे आई-बाबा नसल्याची तिच्या मनावरील जखम नक्कीच कधीही भरून निघणारी नसली तरी त्या जखमेवर आपुलकीने आणि मायेने फुंकर घालण्याचे काम पिंपरी-चिंचवडचे भाजपा शहराध्यक्ष तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केलं आहे. माणुसकीचे नाते जपत आणि माणुसकीचे दर्शन घडवत त्यांनी वैष्णवीच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारण्याचा आणि त्यासाठी आर्थिक मदत करण्याचा शब्द दिला होता. आणि हा शब्द महेश लांडगे यांनी पूर्णही केला आहे. महेश लांडगे यांनी वैष्णवीच्या शिक्षणासाठी पहिला 50,000 चा धनादेश तिला सुपुर्द केला आहे.एवढच नाही तर, दरवर्षी तिच्या शिक्षणासाठी पन्नास हजारांची आर्थिक मदत करणार असल्याचाही महेश लांडगे यांनी शब्द दिला आहे. महेश लांडगे यांनी जपलेल्या या माणूसकीच्या नात्याच खरोखरच कौतूक होत आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या या मदतीमुळे वैष्णवीच्या शिक्षणासाठी मोलाची मदत होणार आहे. आई-वडील नसल्याने वैष्णवीचे शिक्षण अपूर्ण राहू नये किंवा थांबू नये या हेतूने महेश लांडगे यांनी हा निर्णय घेतला.

‘मुलगी शिकली प्रगती झाली’ या सुविचाराचा महेश लांडगे यांनी खरा अर्थ वैष्णवीच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारून समजावला आहे. वैष्णवी अभ्यासात हुशार आहे. त्यामुळे तिला उत्तम शिक्षण मिळावे आणि तिला हव्या त्या क्षेत्रात तिने प्रगती करावी यासाठी महेश लांडगे यांची ही मदत नक्कीच फळाला येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button