breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

केंद्र सरकार लवकरच ‘Unlock 5.0’ साठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी करणार

लवकरच केंद्र सरकार अनलॉक-५ साठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी करणार आहे. करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून सुरू झालेला लॉकडाऊन विविध टप्प्यांमध्ये हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अनलॉकच्या मागील ४ टप्प्यांमध्ये आतापर्यंत मॉल, केशकर्तनालये, रेस्टॉरंट, जिम अशी सार्वजनिक ठिकाणे सुरू करण्यात आलेली आहेत. अनलॉक-४ अंतर्गत जारी करण्यात आलेल्या गेल्या मार्गदर्शत सूचनांमध्ये इयत्ता ९वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांना सशर्थ शाळेत जाण्याची परवानगी मिळाली. त्याच प्रमाणे जिम, योगा सेंटरसारखी ठिकाणे सुरू करण्याची देखील सूट देण्यात आली होती.

एकूण काय तर आतापर्यंत अतिशय गरजेच्या सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आता पर्यंत चित्रपटगृहे, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क अशी ठिकाणे उघडण्यात आलेली नाहीत. त्याच प्रमाणे सार्वजनिक समारंभासाठी देखील परवानगी देण्यात आलेली नाही. तर, शाळा-कॉलेज आणि ट्रेनसेवा देखील पूर्णपणे सुरू करण्यात आलेल्या नाहीत. हे पाहता अनलॉक-५ अंतर्गत आज येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांमध्ये या गोष्टींना परवानगी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, प्राथमिक शाळा उघडण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे.

कार्यक्रमांचे आयोजन आणि सभांना परवानगी मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने देखील दूर्गा पूजेसाठी मंडप उभारण्यास परवानगी दिली आहे. मात्र, मंडपात एकाच वेळी १०० हून अधिक लोक जमा होऊ नयेत अशी अटही घालण्यात आली आहे. मास्क आणि सॅनिटायझरदेखील अनिवार्य करण्यात आले आहे.

देशभरात मर्यादित संख्येने ट्रेनसेवा सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनलॉक-५ अंतर्गत आता मोठ्या संख्येने ट्रेन सुरू होऊ शकतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या बरोबरच इयत्ता ९वी ते १२ पर्यंतच्या शाळा पूर्णपणे सुरू करण्याची परवानगी मिळण्याची देखील शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. मात्र पहिली ते ९वी पर्यंतची शाळा इतक्यात सुरू होण्याची शक्यता कमी आहे.

देशभरात चित्रपटगृहे सुरू व्हावीत यासाठी सरकारवर मोठा दबाव आहे. आतापर्यंत या उद्योगाला १००० कोटींचे नुकसान सोसावे लागले आहे. पश्चिम बंगाल सरकारने १ ऑक्टोबरपासून राज्यात चित्रपटगृहे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. अनलॉक-५ अंतर्गत काही अटींवर देशात चित्रपटगृहे सुरू होऊ शकतात.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button