breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

केंद्राच्या पॅकेजमधील फोलपणा दिसल्यामुळे फडणवीस राज्याकडे पॅकेज मागत आहेत : जयंत पाटील

मुंबई | कोरोना व्हायरसचं संकट रोखण्यात राज्य सरकारला अपयश आल्याचं सांगत भाजपने आज आंदोलन केलं. मात्र राज्य सरकार काम करत असून महाराष्ट्रात सर्वाधिक टेस्टिंग सुरु असल्याचं राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं. सोबतच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधील फोलपणा देवेंद्र फडणवीस यांना दिसला म्हणून आता ते राज्य सरकारकडे पॅकेजची मागणी करत आहेत, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

जयंत पाटील म्हणाले, “राज्य सरकार काम करत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देशातील इतर राज्यात फिरुन यावं मग कळेल राज्यात किती काम सुरु आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त टेस्टिंग सुरु आहे म्हणून रुग्ण दिसत आहेत. इतर राज्यात टेस्टिंग कमी होत आहे.”

 केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही विशेष पॅकेज जाहीर करावं अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तसंच सरकारने राज्यातील जनतेला दमडीही दिली नाही, अशी टीका केली होती. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, “केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजमधील फोलपणा देवेंद्र फडणवीस यांना दिसला म्हणून आता ते पॅकेजची मागणी करत आहेत.” शिवाय “केंद्राने राज्याला पैसे दिले याबाबत देवेंद्र फडणवीस यांना काहीतरी गैरसमज झाला आहे,” असा टोलाही लगावला.

दुसरीकडे महाविकास आघाडीने भाजपविरोधात सोशल मीडियावर आंदोलन सुरु केलं. महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाला मोठ्या धीराने सामोरे जात असताना भाजप गलिच्छ राजकारण करत असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रद्रोही भाजपा हा हॅशटॅग ट्रेण्डिंगमध्ये आहे. भाजपच्या आंदोलनाविरोधात पहिल्यांदा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सोशल मीडियावर एकत्र आले. हा हॅशटॅग सध्या देशात तिसऱ्या क्रमांकावर ट्रेण्डिंगमध्ये आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button