TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

निगडीतील प्राधिकरणाचा भुखंड शिवसृष्टीसाठी राखीव ठेवा; शिवप्रेमींचे तीव्र धरणे आंदोलन!

पिंपरी: निगडीतील भक्ती-शक्ती स्मारकासमोरील रिकामी जागा पीएमआरडीएने विक्रीकरिता काढलेली असल्याने सदरील प्रक्रिया तात्काळ रद्द करून सदरील प्राधिकरणाचा भुखंड शिवसृष्टीसाठी, शिवजयंती उत्सव,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती, निगडीगाव जत्रा उत्सव, तसेच विविध कार्यक्रमांसाठी राखीव करावी,अशी मागणी करत शिवप्रेमींकडून आकुर्डी येथील पीएमआरडीए कार्यालयावर तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले.

        यावेळी भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की,पिंपरी चिंचवड येथील भक्ती शक्ती शिल्पाचे व उद्यानाचे जेव्हापासून लोकार्पण झाले तेव्हापासून पेठ क्र. २४, सर्वे नंबर  १२,१३ व १४ निगडी प्राधिकरण या मोकळ्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आठवडाभर विविध समाज प्रबोधनाचे कार्यक्रम या ठिकाणी आतापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका  व शिवजयंती महोत्सव समिती यांच्यामार्फत पालिका खर्चाने घेण्यात आलेले आहेत.

  निगडीतील भक्ती-शक्ती उड्डाणपुलाचे काम चालू असताना याच जागेमध्ये मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकण्यात आला होता, महानगरपालिकेच्या वतीने दोन ते तीन लाख रुपये खर्च करून हि सर्व जागा समांतर करण्यात आली,एकदा नव्हे तर तीन ते चार वर्षे ही जागा समांतर करण्यात येत होती. याच जागेवर अनेक वर्षापासून शहरातील सर्वात मोठी शिवजयंती म्हणून याच ठिकाणी मोठमोठ्या ३०० कलाकारांचे महानाट्याचे कार्यक्रम पेठ क्र. २४, सर्वे नंबर १२, १३ व १४ या ठिकाणी घेण्यात आले. शहरातील भक्ती शक्ती हे महत्त्वाचे ठिकाण आहे व याच ठिकाणी लागून  ही जागा आहे. या जागेच्या आजूबाजूचा परिसरात पूर्णपणे मोठ-मोठ्या बिल्डिंग उभ्या राहिलेल्या आहेत. शहराचे प्रमुख आकर्षक असणाऱ्या भक्ती-शक्तीला खेटून हा प्राधिकरणाचा भूखंड आहे. जिचा पेठ क्र. २४, सर्वे नंबर १२, १३ व १४  आहे. याच जागेवर  शिवसृष्टी उभारण्यात यावी तसेच ही जागा पूर्णपणे मोकळी ठेवण्यात यावी, जेणेकरून शिवजयंती व अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवानिमित्त ही जागा वापरण्यात येईल.

    छ.शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला. स्वराज्याच्या निर्मितीची सुरुवात ज्या पुणे जिल्ह्यात झाली त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, पराक्रम, प्रेरणा,नियोजन,मार्गदर्शन अशा अनेक विषयावर या जागेवर अनेक नवीन संकल्पना राबविण्यात याव्यात, देशातील सर्वात मोठे पर्यटन स्थळ होण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी भव्य दिव्य शिवसृष्टी उभारण्यात यावी, जेणेकरून देश विदेशातून येणाऱ्या नागरिकांना देखील शिवसृष्टीच्या माध्यमातून माहिती मिळू शकेल. अशी शहरातील शिवप्रेमीची प्रमुख मागणी आहे.

        मिळालेल्या माहिती नुसार पीएमआरडीएकडून हा भूखंड  बिल्डरांना विकण्यात आलेला आहे. तरी या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. लवकरात लवकर विकलेला भूखंड हा पुन्हा पीएमआरडीएने ताब्यात घ्यावा व यावर  मोठी शिवसृष्टी उभारण्यात यावी ही जागा विविध कार्यक्रमासाठी नागरिकांसाठी खुली करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.

आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे.

१) या शिवछत्रपतींच्या जयंती उत्सवाचा भूखंड बाबत पी एम आर डी ए व बांधकाम व्यवसायिकांमध्ये झालेले सर्व व्यवहार रद्द करण्यात यावेत.

२) या जागेत राज्य सरकार महानगरपालिका व पी एम आर डी ए ने छत्रपती शिवरायांच्या जीवनावर भव्य दिव्य “शिवसृष्टी” उभारण्यात यावी.

३) मनपाच्या वतीने होणारी शिवजयंती सालाबाद प्रमाणे याच जागेवर व्हावी.

४) मनपाच्या वतीने होणारी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव याच जागेवर व्हावी.

५) भक्ती शक्ती शिल्पसमूहासमोरील पी एम पी एल डेपोच्या जागेवर मेट्रोचे अखेरचे स्टेशन होणार. त्यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याचे स्थलांतर करावे लागणार. त्यामुळे अण्णाभाऊंचा पुतळा याच जागेत बसवण्यात यावा.

६) समस्त निगडी ग्रामस्थांच्या “गाव जत्रेचा” (कुस्त्या, तमाशा) आदि कार्यक्रम याच जागेत होतात.

त्यामुळे आपणास या पत्राद्वारे विनंती आहे कि, तत्काळ विक्री केलेला सदर भूखंड परत ताब्यात घेऊन हि जागा जनहिताच्या कार्यक्रमासाठी कायमस्वरूपी राखीव ठेवावी. या आंदोलनासाठी  सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर,पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित गव्हाणे, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, पिंपरी चिंचवड मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले,मा.नगरसेवक राजू मिसाळ,आपचे चेतन बेंद्रे, माजी महापौर कवी चंद भाट, मा.नगरसेविका संगीता ताम्हणे,भाजपचे अनुप मोरे,छावा मराठा युवा महासंघाचे धनाजी येळकर-पाटील,भाऊसाहेब आडागळे, सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार, विनायक रणसूबे, बाळा दाणावले,नरेंद्र बनसोडे,मेघा पळसकर,वैभवी घोडके,पुनम वाघ,युवराज कोकाटे,विठ्ठल शिंदे,गणेश सरकटे,संतोष वाघ,सचिन आल्हाट,गणेश भांडवलकर,मोईन शेख,अण्णासाहेब कसबे,युवराज पवार,राजेश हरगुडे,निखिल भोईर,पल्लवी पांढरे,मंगला मनुष्यस्वर,माधव पाटील,संगीता कोकणे,अरुण थोपटे,रोहिदास शिवणकर,राहुल येवले, सचिन उदागे, फ प्रभाग जुलूस कमिटीचे बाबा आलम,गणेश बाफना,सचिन काळभोर,वैभव फडतरे, मामु मुखर्ताल,मनोज लांडगे, जय सकट, प्रदीप घोडके,गणेश वाघमारे, सचिन बोराडे, वैभव फाळके आदी आंदोलनासाठी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button