TOP Newsताज्या घडामोडीपुणे

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपीचा निर्णय ;मध्यवर्ती भागातील सात मार्ग पूर्ववत

पुणे: मध्यवर्ती भागातील बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने मार्गांमध्ये पीएमपी प्रशासनाने केलेल्या बदलांवरून टीका झाल्यानंतर अखेर मध्यवर्ती भागातील सात मार्ग पूर्ववत करण्यात आले आहेत. मार्गांमध्ये बदल केल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदारांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला असून या निर्णयाची अंमबजावणी शुक्रवारपासून (४ नोव्हेंबर) होणार आहे.

कात्रज ते शिवाजीनगर, सहकारनगरन ते संगमवाडी, स्वारगेट ते सांगवी, मार्केटयार्ड ते घोटावडे फाटा, नरवीर तानाजी वाडी ते सहकारनगर, अप्पर डेपो ते सुतारदरा आणि मार्केटयार्ड ते पिपंरी गाव हे मार्गावरील गाड्या पूर्वत दांडेकर पूल, शास्त्री रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, शिवाजी रस्ता आणि येताना जंगली महाराज रस्त्याने डेक्कन मार्गे टिळक रस्त्याने धावणार आहेत. एकूण ३१ गाड्यांच्या माध्यमातून ३४४ फेऱ्या या मार्गावर होणार आहेत.

मध्यवर्ती भागातील बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या नावाखाली पीएमपीकडून बाजीराव रस्ता मार्गे संचलनात असलेल्या मार्गांमध्ये बदल केल्याने विद्यार्थी, नोकरदार आणि अन्य प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती. त्यावरून वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था-संघटनांकडून पीएमपी प्रशासनावर टीका करण्यात आली. ऑगस्ट महिन्यात यातील काही मार्ग पूर्ववत करण्यात आले होते. मात्र आता पूर्ण मार्ग पूर्ववत करण्यात आल्याने विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होणार नाही, असा दावा पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button