breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

PKL 2021: प्रो कबड्डी लीगला 22 डिसेंबरपासून सुरुवात

भारतातील लोकप्रिय लीग पीकेएलला  येत्या 22 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. प्रो कब्बडी लीग 2021-22 चं वेळापत्रक प्रसिद्ध झालं असून तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कबड्डीचे सामने प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. या स्पर्धेत 12 संघ आमने-सामने येणार आहेत. पहिला सामना बेंगलोर आणि मुंबई यांच्यात रंगणार आहे. या स्पर्धेसाठी ऑगस्ट महिन्यात खेळाडूंचं ऑक्शन झालंय. पीकेएलमध्ये कोणत्या संघानं सर्वाधिक विजेतेपदे जिंकली आहेत? याची यादी पाहुयात. घेऊयात.

पीकेएलच्या आठव्या हंगामात कोणता संघ बाजी मारेल? हे स्पर्धेच्या शेवटीच स्पष्ट होईल. पीकेएलचा पहिला हंगाम 2014 मध्ये खेळवण्यात आला. त्यावेळी अनेकांना या स्पर्धेबाबत माहिती नव्हती. भारतात सर्वाधिक क्रिकेटसारख्या खेळाला मोठी पसंती दर्शवली जाते. यामुळं पीकेएल जास्त लोकांना आवडणार नाही, असा भिती व्यक्त केली जात होती. परंतु, या स्पर्धेला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत 8 संघ खेळायचे. मात्र, या हंगामात 12 संघ आमने-सामने येणार आहेत. महत्वाचं म्हणजे, या स्पर्धेतील खेळाडूंना कोटी रुपये पगारही मिळतो.

पीकेएलचे आतापर्यंत सात हंगाम पार पडले आहेत. ज्यात पीकेएलचे सर्वाधिक किताब पाटणा पायरेट्सनं पटकावले आहे. पाटणा पायरेट्सने तीनदा विजेतेपद पटकावले आहेत. या स्पर्धेत पाटणा व्यतिरिक्त कोणत्याही संघाला दोनदा विजतेपद मिळवता आले नाही. जयपूर पिंक पँथर्स, यू मुंबा, बेंगळुरू बुल्स आणि बंगाल वॉरियर्स यांनी प्रत्येकी एकदा विजेतेपद पटकावलंय. पाटणा पायरेट्सनं नुकतीच प्रशांत कुमार राय यांची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केलीय.

पाटणा पायरेट्सनं आतापर्यंत एकूण 134 सामने खेळले आहेत, त्यापैकी 70 जिंकले आहेत आणि 51 गमावले आहेत. तसेच 13 सामने अनिर्णित राहिले. यामध्ये यू मुम्बानं पटनाचा पराभव केला असून यू मुम्बानं सर्वाधिक 81 सामने जिंकले आहेत. पण इतर कोणत्याही संघाला 70 किंवा त्याहून अधिक सामन्यात विजय मिळवता आला नाही.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button