पिंपरी ‘आरटीओ’कडून वाहन चालकांचा सन्मान
वाहन चालक दिनानिमित्त चाकण येथे कार्यक्रम

पिंपरी : पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वाहन चालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महिंद्रा लॉजिस्टिक चाकण येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी शहरातील चालकांना पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. विविध ठिकाणी जाऊन वाहन चालकांना त्यांची समाजातील महत्वाची भूमिका कशी आणि का आहे? या बाबत मार्गदर्शन केले.
महिंद्रा लॉजिस्टिक्स चाकण व प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महिंद्रा लॉजिस्टिक्स मॅनेजिंग डायरेक्टर राम, नरेश गोयत, निंबा भामरे ऑपरेशन, विजय भापकर मेडिकल टीम या वेळी उपस्थित होते.
या वेळी बस चालक, ट्रक चालक, सगळे माल वाहतूक चालक, अंबुलन्स चालक, फायर फायटर चालक, कचरा संकलन वाहनांचे चालक, रिक्षा चालक, टॅक्सी चालक, पीएमपीएम चालक आदींचा सन्मान करण्यात आला.
वाहनचालकांची आरोग्य तपासणी…
संपूर्ण भारतभर महिंद्रा उत्पादित वाहनांची डिलिव्हरी देणे व विविध भागातून सुटे पार्ट महिंद्रा लॉजिस्टिक चाकण येथे वाहतूक करणाऱ्या 250 वाहन चालकांना गुलाब पुष्प व शुभेच्छा देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच चालक दिनानिमित्त उपस्थित वाहन चालकांचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. 88 वाहनचालकांनी आरोग्य तपासणी करून घेतली.