पिंपरी / चिंचवड

झोमॅटो डिलिव्हरी बॉयने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

  • पिंपरी | प्रतिनिधी

खेळून घरी येत असलेल्या आठ वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 7) दुपारी साडेबारा ते दीड वाजताच्या कालावधीत बावधन येथे घडली.

निखिल विलास भालशंकर (वय 30, रा. वारजे, पुणे. मूळ रा. दहिवडी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या 41 वर्षीय आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आठ वर्षीय मुलगी सोसायटीच्या परिसरात खेळून दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घरी येत होती. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी झोमॅटो डिलिव्हरी बॉयने फिर्यादी यांच्या मुलीसमोर अश्लील कृत्य केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना देवतळे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button