पिंपरी येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/Arrest.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
पिंपरी डेअरी फार्म रोडवरील शंकराच्या मंदिराजवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन किलो 100 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 27) सायंकाळी साडेपाच वाजता करण्यात आली.
भगवान गोविंद जोगदंड (वय 20, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड. मूळ रा. नारवाडी, परभणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक तरुण पिंपरी डेअरी फार्म रोडवरील शंकराच्या मंदिराजवळ गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास सापळा लावून कारवाई केली. त्यात पोलिसांनी भगवान जोगदंड याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 67 हजार 500 रुपये किमतीचा दोन किलो 100 ग्रॅम गांजा, मोबाईल फोन आणि आधारकार्ड असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी तपास करीत आहेत.