पिंपरी / चिंचवड
कोयता बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक
![5 arrested for fatal attack on youth](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/koyta-2.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
कोयता बाळगल्या प्रकरणी भोसरी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 4) दुपारी दापोडी येथे केली.
सौरभ उर्फ मसाल्या किशोर परदेशी (वय 22, रा. बॉम्बे कॉलनी, दापोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस कर्मचारी तुषार वराडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 3 ते 16 मे या कालावधीमध्ये घातक शस्त्र बाळगणे मनाई आदेश आहे. या आदेशाचे उल्लंघन करून आरोपी सौरभ हा कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे कोयता मिळून आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.