Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आरोग्य निरोगी राहण्यासाठी योग साधना अत्यंत गरजेची – दिनेश यादव

  • कुदळवाडीत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अबालवृद्धांनी गिरविले योगासनाचे धडे

चिखली – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात स्वतःच्या आरोग्यसाठी योग साधनेची गरज लक्षात घेऊन त्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कुदळवाडीतील तात्यासाहेब सपकाळ क्रिडांगण येथे आज सोमवारी (दि. २१) रोजी योग प्राणायम शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात योग शिक्षक राजेंद्र पाठक यांनी उपस्थितांसाठी मार्गदर्शन, प्रात्यक्षिकाचे सादरीकरण केले. चिखली-कुदळवाडी परिसरातील एकूण ९० साधकांनी यात सहभाग घेतला. यामध्ये वय वर्ष ८ पासून ते ६० वर्षीय योग साधकांनी सहभाग घेऊन योग साधनेचे धडे घेतले. यात प्रत्येक आसनाचे फायदे, आसन घेण्याची पद्धत आदीची माहिती देण्यात आली. आपला श्‍वास व आपले आरोग्य खूप महत्त्वाचे आहे. आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी योग साधना अत्यंत गरजेची आहे या भावना साधकांनी व्यक्त केल्या.

शिबिरात रोग प्रतिकारशक्ति वाढवण्यास उपयुक्त विविध सूक्ष्मयोग आसानांचे, प्राणायामांचे तसेच जलनेती शुद्धीक्रियेचे कृतीयुक्त प्रशिक्षण देण्यात आले. कोणत्याही व्यक्तीला सहज करता येणाऱ्या खांघाच्या हालचाली, कंबरेच्या हालचाली, हस्तउत्तानासन, हस्तपादासन, एकहस्त कटीचक्रासन, अर्धचक्रासन, वज्रासन, शशांकासन, अद्वासन, तिर्थक भुजंगासन, सरल मत्स्यासन, शवासन, प्रणायामात- सूर्यानुलोम-विलोम, सुर्यभेदन, भस्रिका, उज्जयी प्राणायाम, दीर्घश्वसन, जलनेती, तसेच इतर शरीर शुद्धिक्रिया इत्यादि कृति करुन दाखवून करून घेण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चा पिपंरी चिचंवड शहर व आमदार श्री पै महेशदादा लांडगे युवा मंच, कुदळवाडीच्या वतीने स्वी. नगरसदस्य दिनेश यादव यांनी केले होते. यावेळी वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य आंनदा यादव, युवराज पवार, प्रसाद मायभट्टे, विजयराज यादव, काका शेळके, राजेंद्र पाठक, प्रंशांत रोकडे, सुरेश वाळुंज, रुपेश हरगुडे, पवन तिवारी, अतुल सोनकांबळे, शिवाजी भिडवे, बालजी पांचाळ, रुषीकेश भालेकर, कुमार होले,
नारायण देशपांडे, आनंद आधारकट्टी, रुपेश सपकाळ, रविंद्र होनप यासह परिसरातील नागरिकांनी सहभाग नोंदवला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button