Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

खंडोबाच्या जेजुरीपर्यंत मेट्रोविस्ताराची मागणी; मुख्यमंत्र्यांना विश्वस्तांकडून निवेदन

खंडोबाच्या नगरीला मेट्रो हवी; आर्थिक-पर्यटन विकासाचा मुद्दा पुढे

पुरंदर : महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा आणि भारतीय लोकदेवतेचे तीर्थक्षेत्र असलेल्या जेजुरीपर्यंत मेट्रोसेवा सुरू करण्याची मागणी वेग धरू लागली आहे. श्री मार्तंड देवस्थानच्या वतीने विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत ही मागणी केली.

सध्या राज्य सरकारने पुणे मेट्रोचा विस्तार सासवडपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सासवडपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या जेजुरीचे महत्त्व लक्षात घेता मेट्रोमार्गाचा पल्ला जेजुरीपर्यंत वाढविण्यात यावा, अशी विनंती देवस्थानच्या विश्वस्तांनी केली आहे.

जेजुरी हे राज्यातील अत्यंत लोकप्रिय धार्मिक ठिकाण असून दररोज देशभरातून आणि विदेशातून हजारो भाविक आणि पर्यटक येथे भेट देतात. मंदिर परिसरातील उत्सव, जत्रा आणि यात्रा पाहण्यासाठी वर्षभर गर्दी उसळलेली असते. पुणे महानगर क्षेत्रातूनही मोठ्या प्रमाणावर भाविक जेजुरीकडे ये-जा करतात.

हेही वाचा –  वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी केवळ 200 रुपयात, सरकाराचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा

मेट्रोचा विस्तार जेजुरीपर्यंत झाला तर तीर्थक्षेत्रासह पर्यटन, आद्योगिक वसाहती आणि स्थानिक व्यवसायांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो, असे खेडेकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ या भागाच्या अगदी निकट असल्याने भविष्यातील वाहतूक व्यवस्थेसाठीही हा विस्तार उपयुक्त ठरेल, असा युक्तिवाद त्यांनी मांडला.

जेजुरी परिसरात अनेक लघु उद्योग असून शेकडो लोकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी जेजुरीकर ग्रामस्थ, मानकरी आणि खान्देकरी यांच्या वतीने डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“जेजुरी हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर देश-विदेशातून भाविकांना आकर्षित करणारे महत्त्वाचे पर्यटन केंद्र आहे. मेट्रोचा पल्ला जेजुरीपर्यंत वाढला तर तीर्थक्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळेल आणि स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. सरकारने या मागणीचा गांभीर्याने विचार करावा.

– डॉ. राजेंद्र खेडेकर, विश्वस्त, श्री मार्तंड देवस्थान.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button