Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उत्साह तोच..ठिकाण नवे : विश्वविक्रमी ‘रिव्हर सायक्लोथॉन’ यंदा होणार मोशीत!

छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या मैदानावर सायकलपटूंचा मेळा

आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून नदी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरात होणाऱ्या ‘पिंपरी-चिंचवड रिव्हर सायक्लोथॉन’ या भव्य उपक्रमासाठी शहर सज्ज झाले आहे. यंदाच्या सायक्लोथॉनमध्ये तब्बल 35 हजाराहून अधिक सायकलस्वार सहभागी होणार असून, उपक्रमासाठी प्रथमच नव्या, सुसज्ज ठिकाणी जागानिश्चिती केली आहे. ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, बोऱ्हाडेवाडी, मोशी या प्रशस्त ठिकाणी विश्वविक्रमी रिव्हर सायक्लोथॉन होणार आहे.

इंद्रायणी नदी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून प्रतिवर्षी ‘‘रिव्हर सायक्लोथॉन’’ चे आयोजन करण्यात येते. भोसरी येथील गावजत्रा मैदानावर होणारी सायक्लोथॉन यावर्षी नागरिकांचा प्रतिसाद आणि संभाव्य गर्दी याचा विचार करुन मोशी येथील प्रशस्त जागेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे-नाशिक महामार्गालगत असलेले हे स्थळ मोठ्या प्रमाणावरील गर्दीला सहज सामावून घेण्याची क्षमता ठेवत असल्याने सहभागी व नागरिकांमध्ये याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. गतवर्षी या सायक्लोथॉनची -जगातील सर्वात लांब सायकल रांग’ म्हणून ‘गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. आता पुन्हा एकदा यंदाची सायक्लोथॉन नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

हेही वाचा     :            मिशन–PCMC : महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार गटाची ‘कोअर कमिटी’ जाहीर 

दोन प्रवेशद्वारांद्वारे काटेकोर वाहतूक नियोजन…

सायक्लोथॉनसाठी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीचा विचार करून आयोजकांनी उत्तर व दक्षिण दिशांना स्वतंत्र प्रवेशद्वारे उपलब्ध करून देत वाहतूक व्यवस्थेचे काटेकोर नियोजन केले आहे, अशी माहिती सायक्लोथॉनचे मुख्य समन्वयक डॉ. निलेश लोंढे यांनी केले आहे. या उपक्रमाचे संयुक्त आयोजन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, अविरत श्रमदान, सायकल मित्र, WTE फाउंडेशन आणि महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या विविध शाळा-महाविद्यालय आणि विविध संस्था-संघटना करीत आहेत.

1. उत्तरेचा प्रवेशद्वार- गेट क्र.1

वॉक-इन, टू-व्हीलर व फोर-व्हीलर वाहनांचा प्रवेश या ठिकाणी असून, प्रवेश वेळ सकाळी 6.30 पर्यंत ठेवण्यात आली आहे. बोऱ्हाडेवाडी, मोशी, चिखली आदी परिसरातील नागरिकांनी या गेटचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गेट व पार्किंगसाठी लोकेशन :
– एन्ट्री गेट 1 : https://maps.app.goo.gl/oPsVm1hdiaKkDcicA

– पार्किंग : https://maps.app.goo.gl/aKxjiTKsxSp5NLNw8

2. दक्षिणेचा प्रवेशद्वार- गेट क्र. 2

सर्व प्रकारची वाहनं या गेटमधून प्रवेश करू शकतात. प्रवेशासाठी अंतिम वेळ सकाळी 6 वाजेपर्यंत निश्चित आहे. इंद्रायणी नगर, भोसरी, निगडी परिसरातील नागरिकांनी या मार्गाचा वापर करावा.
लोकेशन :
– एन्ट्री गेट 2 : https://maps.app.goo.gl/iGg6YbxW9gy2Tc788
– पार्किंग : https://maps.app.goo.gl/gXtjhvNAvcCrVSPM7

रिव्हर सायक्लोथॉनसाठी होणारी मोठ्या प्रमाणावरील गर्दीची शक्यता लक्षात घेता दोन स्वतंत्र प्रवेशद्वारे आणि मोठ्या पार्किंग व्यवस्था तयार केली आहे. सहभागी होणाऱ्या पर्यावरप्रेमी, सायकलपटू आणि सर्व नागरिकांनी वाहतुकीचे नियम, दिशादर्शक, स्वयंसेवकांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. ज्यामुळे सायक्लोथॉन यशस्वी होईल. सुरक्षिततेसाठी गेट बंद होण्याची वेळ पाळणे, निर्धारित मार्गानेच प्रवेश करणे आणि कार्यक्रमादरम्यान संयम राखणे आवश्यक आहे. कार्यक्रम स्थळी चहा-नाष्टा सुविधा देखील उपलब्ध असून सहभागींसाठी सकाळीपासूनच आवश्यक व्यवस्था केली आहे. मोठ्या संख्येने पुणे-पिंपरी-चिंचवडकरांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन करतो.

– डॉ. निलेश लोंढे, मुख्य समन्वयक.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button