Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सत्तेवर नाही तर सेवेवर माझा विश्वास : अनुराधा साळुंके

मिशन- PCMC : प्रभाग-3 चऱ्होली-मोशी-डुडूळगावमधून निवडणुकीच्या रिंगणात

पिंपरी-चिंचवड :  पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सर्वसामान्य कुटुंबातून सर्वसामान्य लोकांसाठी काम करण्याची इच्छा असलेले सामान्य कुटुंबातील इच्छुकही पुढे येत आहेत. चऱ्होली प्रभाग- ३ मधून कष्टकरी-वंचित लोकांसाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी सकारात्मक दृष्टीने काम करणाऱ्या अनुराधा साळुंके यांनीसुद्धा निवडणूक लढण्याचा संकल्प केला आहे. या निमित्ताने प्रभागातील नागरिकांना त्यांनी भावनिक आवाहन केले आहे.

हेही वाचा –  भाजपचा ‘बिनविरोध’ पॅटर्न जोरात, मंत्री गिरीश महाजनांची पत्नी नगराध्यक्षपदी विजयी

अनुराधा साळुंखे यांनी केले आवाहन…

नमस्कार,
मी अनुराधा दिपक साळुंके… प्रभाग क्रमांक ३ , चऱ्होली, मोशी, डुडूळगाव, गंधर्व नगरी, साई मंदिर, व संत ज्ञानेश्वर नगर भोसरी येथून, अनुसूचित जाती प्रवर्गातून इच्छुक आहे.”

मी आयुष्यभर समाजातच वाढले… समाजासाठीच झटले. माहेरी आणि सासरी परिस्थिति हलाखीची होती. स्वतःचं घर नव्हतं. पण कष्टानं, संघर्षानं आयुष्य उभं केलं. म्हणूनच मी प्रत्येक महिलेला उभं राहिलेलं पाहू इच्छिते.

माझे पती दिपक साळुंके यांना लहान पनापासून सामाजिक कामाची आवड आहे. त्यांच्या च पावलावर पाऊल ठेवत मी काम करत आहे. खुशी चॅरिटेबर ट्रस्ट च्या माध्यमातून आम्ही ८९ अनाथ मुलांचं संगोपन, वृद्धाश्रम सेवा, ऊसतोड, पूरपरिस्थिती मुळे अडचणीत आलेल्या कुटुंबांना, मजुरांच्या मुलांना आधार अशी कितीतरी कामे केली आहेत. कर्तव्य भावनेने सामाजिक काम करत आहोत. तरुणी व तरुणांना नोकरी शोधणारे नव्हे, नोकरी निर्माण करणारे बनवणं ही माझी भूमिका आहे.

चऱ्होली, मोशी, डुडूळगाव, गंधर्व नगरी, साई मंदिर, व संत ज्ञानेश्वर नगर भोसरी परिसरातील जनतेची साथ मिळाल्यास प्रभागाचा चेहरा बदलण्याचा निर्धार आहे. मी राजकारणात येत नाही, मी समाजाच्या वेदना घेऊन येते आहे. माझा प्रभाग, माझी जबाबदारी – हीच माझी खरी ओळख आहे. सत्तेवर नाही तर सेवेवर माझा विश्वास आहे. कारण सेवा हीच माझी ओळख आणि शक्ती आहे.

मी अनुराधा दिपक साळुंके
माझा प्रभाग माझी जबाबदारी.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button