Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘नागरिकांचा विश्वास सार्थ ठरविणार’; आमदार शंकर जगताप

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचा ऐतिहासिक विजय; पक्ष कार्यालयात जल्लोषाचा उत्साह

पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी अधिक वेगाने काम करण्याचा निर्धार!

पिंपरी  : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये शहरातील नागरिकांनी भाजपाला एक हाती कौल दिला. शहरातील नागरिकांना विकासाचे व्हिजन मान्य आहे. आगामी काळात नागरिकांचा हा विश्वास सार्थ ठरवणार असल्याचे निवडणूक प्रचार प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने १२८ जागांपैकी ८५ जागांवर निर्विवाद बहुमत मिळवत दणदणीत विजय संपादन केला आहे. या विजयामुळे शहराच्या राजकीय इतिहासात भाजपने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले असून, पक्ष कार्यकर्ते व समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या विजयाचा जल्लोष पिंपरीतील मोरवाडी येथील भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी साजरा केला. एकमेकांना पेढे भरवत या उत्साहात कार्यकर्ते सहभागी झाले.

यावेळी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, माजी प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, सरचिटणीस मधुकर बच्चे, विजय फुगे आदि उपस्थित होते .

हेही वाचा –  पालिकेकडून कंत्राटी महिला कामगारांना रात्रीच्या वेळी सफाई कामातून दिलासा

यावेळी आमदार शंकर जगताप म्हणाले, या निवडणुकीत भाजपने मांडलेले विकासाचे स्पष्ट व्हिजन, पायाभूत सुविधांचा विस्तार, सक्षम नागरी सुविधा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि पारदर्शक प्रशासन यांना नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. मतदारांनी विकासाला प्राधान्य देत भाजपच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब केले आहे. हा विजय म्हणजे नागरिकांचा विश्वास असून, तो सार्थ ठरवण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही आमदार जगताप स्पष्ट केले.

यावेळी सर्वांनी शहरवासीयांचे आभार मानत, आगामी काळात पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी अधिक वेगाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button