पिंपरी-चिंचवडच्या एमआयडीसी भागातील पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद
![Water supply in MIDC area of Pimpri-Chinchwad will be closed on Thursday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/ceWy9Jn5_400x400.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पावसाळा पूर्वीचे देखभाल व दुरुस्तीचे काम गुरुवारी (दि.27) करण्यात येणार आहे. त्यामुळे एमआयडीसी पाणीपुरवठा करत असलेल्या विविध भागातील गुरुवारचा पाणीपुरवठा सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार आहे, अशी माहिती उपअभियंता कल्पेश लहिवाल यांनी दिली.
लहिवाल म्हणाले की, राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल व दुरुस्तीचे काम गुरुवारी करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. एमआयडीसीकडून होणाऱ्या पिंपरी, चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, आर अँड डी, दिघी, व्हीएसएनएल, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या भागात गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (दि.28) पाण्याचा पुरवठा हा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाण्याचा साठा करावा. पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.