breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#WAR AGAINST CORONA: आमदार महेश लांडगे यांची शेती, माती आणि संस्कृतीशी नाळ, लॉकडाउनमध्ये ‘अशीही’ आवड जोपासली!

–  कार्यकर्त्यांच्या गराड्यात दिसणारे आमदार गोठ्यावर धार काढण्यात व्यस्त

– कोरोना लॉकडाउनमध्ये सामाजिक बांधिलकी आणि आवडही जोपासणारा नेता

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

शेतकरी-कष्टकरी कुटुंब…वडिल चाकरमानी, शहरी भागात राहत असतानाही आजही घराजवळ गुरांचा गोठा… अशा ‘सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले असामान्य नेतृत्त्व’ म्हणून आमदार महेश लांडगे यांची ओळख.  सध्या भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी…पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार आणि  सामाजिक बांधिलकीसाठी विविध उपक्रम हाती घेणारे आमदार लांडगे यांचा दिनक्रम अत्यंत व्यस्त असतो. मात्र, सध्या कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे उपलब्ध झालेला वेळ छंद आणि कौटुंबिक वातावरणातव्यतित करताना आमदार लांडगे दिसत आहेत.

लॉकडाउनमुळे सर्वांनाच आपआपला छंद आणि आवडी-निवडी जपता येत आहेत. संकटाची परिस्थिती असतानाही नागरिक कुटुंबियांमध्ये रमताना दिसतात. कायम कार्यकर्त्यांच्या गराड्यात असणाऱ्या आमदार लांडगे यांचे लॉकडाउनच्या काळात दैनंदिन वेळापत्रक कसे असते? हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आज (सोमवारी) होता. पक्ष कार्यालयात सहकारी आमदार लक्ष्मण जगताप आणि दोन-तीन पदाधिकाऱ्यांच्या सोबतीने आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी पक्ष कार्यालयासमोर पक्षाचे ध्वजारोहण केले. पक्षाकडून प्रदेश आणि केंद्रीय पातळीवरून आलेल्या सूचनांचे पालन करीत दिवसभराचे कामकाज मार्गी लावले. दुसरीकडे, कोरोना विरुद्धच्या लढाईत आमदार लांडगे आणि ‘टीम’ने पिंपरी-चिंचवडमधील सुमारे १० हजार गरजु कुटुंबियांना अन्नधान्य वाटपाची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ‘पुन्हा एक हात मदतीचा’हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याबाबत संपूर्ण पिंपरी-चिंचवडमधून मदत आणि नियोजनाचा आढावा घेतल्यानंतर आमदार लांडगे यांनी दुपारची न्याहारी केली. ‘वर्क फॉर्म होम’करीत सर्व कामकाम मार्गी लावल्यानंतर आमदार लांडगे काहीवेळ घरच्या लोकांसोबत चर्चा आणि मुलांसोबत गप्पा गोष्टी करण्यात रमले होते. त्यानंतर सायंकाळी आमदार लांडगे थेट गोठ्याकडे रवाना झाले…

          भोसरी आणि परिसरात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. तरीही भोसरीकरांनी आपली ग्रामीण संस्कृती टिकवली आहे. आजही आमदार लांडगे यांच्याघराशेजारी गोठा आहे. त्यामधील गुरांच्या दैनंदिन बाबींकडे लांडगे यांचे बारीक लक्ष असते. म्हशींना भरडा-पाणी झाल्यानंतर आमदारांनी थेट बादली हातात घेवून धार काढायला बसले… गोठ्यावर काम करणाऱ्या गुराख्याला ही बाब आश्चर्याची नव्‍हती. कारण, ज्या-ज्या वेळी आमदार निवांत असतात …त्यावेळी ते गोठ्यावर येतात…आमची आपुलकीने विचारपूस करतात आणि गुरांच्या सानिध्यात वेळ व्यतित करतात…असे संबंधित गुराखी सांगत होता.

          सुमारे २० वर्षे राजकारण…नगरसेवक, स्थायी समिती सभापती, अपक्ष आमदार, पुन्हा सलग दुसऱ्यांदा भाजपकडून आमदार, महापालिकेतील सत्तेचा कारभार आणि आता शहराध्यक्षपदाची जबाबदारी…असा अत्यंत रोमहर्षक राजकीय प्रवास आमदार लांडगेंचा दिसतो. पण, या सर्व धकाधकीच्या जीवनात शेती-माती आणि संस्कृतीशी असलेली नाळ आमदार लांडगे यांनी कधी तुटू दिली नाही…हेच त्यांच्या यशाचे गमक असावे. त्यांचा म्हशीची धार काढतानाचा व्‍हीडिओ पाहिला…राजकारणाचे मैदान गाजवणारा रांगडा पैलवान गोठ्यावरसुद्धा कसा लिलया वावरत असतो…हेच अधोरेखित होत होते.

पहा व्‍हीडिओ…

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button