विशालनगर- पिंपळे निलख येथील सायकलस्वारांनी केली गोवा राईड ‘फत्ते’
![विशालनगर- पिंपळे निलख येथील सायकलस्वारांनी केली गोवा राईड 'फत्ते'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/WhatsApp-Image-2021-11-13-at-2.26.34-PM.jpeg)
पिंपरी | प्रतिनिधी
सायकल चालवा, प्रदूषणाला आळा घाला असे संदेश देत विशाल नगर, पिंपळे निलख येथील सायकलस्वारांनी गोवा राईड फत्ते केली. विशाल नगर , पिंपळे निलख येथील सायकलस्वारांनी 7 ऑक्टोबर रोजी सकाळी चार वाजता पिंपळे निलख येथून निघून पहिल्या दिवशी 197 किलोमीटर अंतर पार करून कराडच्या पुढे नेरले येथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी कोल्हापूरच्या अंबाबाई मातेचे दर्शन करून पुढील मुक्काम आजरा येथे अंतर 140 किलोमीटर अंतर पार केले.
तिसऱ्या आणि फायनल दिवशी म्हणजे 9 ऑक्टोबर रोजी 115 किलोमीटर अंतर पार करून गोवा येथील बाघा बिच येथे राईड संपली. या राईड मध्ये एकूण अंतर 452 किलोमीटर या सायकलवीरांनी पार केले. या मोहिमेमध्ये चंद्रकांत ववले , पवन कामठे , जितीन इंगवले, विनोद बोडके, संजय टिळेकर, संतोष दरेकर , सुनील अडसूळे, उमेश साठे , रामदास दरेकर , सौरभ शेटे आणि राकेश गिरमे या 11 सायकलवीरांनी सहभाग घेतला.
- पृथ्वीचे रक्षण करण्याचा संदेश…
या संपूर्ण प्रवासात जागो जागी सायकल चालवा प्रदूषण टाळा. झाडे लावा , झाडे वाढवा आणि आपल्या पृथ्वीचे रक्षण करा असा संदेश प्रसारित केला. जागोजागी लोकांनी प्रोत्साहन दिले व आम्ही ही सायकल चालवून प्रदूषणाला आळा घालू असे वचन दिले.